Corona Update: देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले, तर ३८५ मृत्यूंची नोंद

गेल्या २४ तासांत १ लाख ५१ हजार ७४० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

देशातील गेल्या २४ तासांत अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमी रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात करोनाचे २,५८,०८९ रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत दैनंदिन प्रकरणांमध्ये ४ टक्क्यांनी घट झाली आहे. शुक्रवारी देशात करोनाचे २,७१,२०२० बाधितांची नोंद करण्यात आली होती. यासह, गेल्या २४ तासांत देशात ८२०९ ओमायक्रॉन रुग्ण आढळले. शुक्रवारच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये ६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

गेल्या २४ तासांत १ लाख ५१ हजार ७४० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख ३७ हजार ४६१ जण करोनातून बरे झाले आहेत. तर, देशात सध्या १६ लाख ५६ हजार ३४१ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ११९.६५ टक्के आहे. शुक्रवारच्या तुलनेत देशात १३ हजार ११३ कमी बाधित नोंदवले गेले आहेत. तर, देशातील रिकव्हरी रेट सध्या ९४.२७ टक्के आहे.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

देशात आतापर्यंत १५७.२० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७०.३७ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.