corona update : देशात १४७ दिवसानंतर सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद, ३७३ रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत ४१,५११ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला. दरम्यान देशात दिलासादायक वातावरण आहे. मात्र काही राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनंदिन आढळणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान देशात आज १४७ दिवसानंतर सर्वाधिक कमी करोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २८,२०४ नवीन करोना रुग्ण आढळले आणि ३७३ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ४१,५११ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी १९ लाख ९८ हजार लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख २७ हजार ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ११ लाख ८० हजार रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांपेक्षा कमी झाली आहे. सध्या देशात एकूण ३ लाख ८८ हजार ५०८ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

ग्रामीण भागात लसीकरणाला वेग

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे देशात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरवात झाली आहे. ग्रामीण विभागात देखील लसीकरण करण्यात येत आहे.  १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना करोना  देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. दरम्यान १ मे ते २३ जून दरम्यान ग्रामीण भागात एकूण डोसच्या केवळ ५१ टक्के साठा देण्यात आला आहे. केंद्राने २६ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे.

हे वाचले का?  SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?

दरम्यान आता ग्रामीण भागात लसीकरणाने जोर पकडला आहे. गेल्या तीन आठवड्यांत एकूण ९.८७ दशलक्ष डोसपैकी ६.२२ कोटी डोस ग्रामीण भागात दिले गेले, जे एकूण डोसच्या ६३ टक्के आहे. अशा प्रकारे ग्रामीण भागात लसीकरणाची दैनंदिन सरासरी आता वाढून २९.६६ लाख झाली आहे.राज्यात दिवसभरात ४५०५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली तर ६८ जणांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ७५६८ करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६८ हजार ३७५ इतकी झाली आहे. राज्यात दिवसभरात अहमदनगर येथे ५७५, पुणे ३९८, पुणे मनपा १३९, पिंपरी चिंचवड ११८, सोलापूर ४०१, सातारा ५६५, कोल्हापूर ३३५, सांगली ४७८, सांगली-मिरज-कूपवाड १११, रत्नागिरी ११३, बीड येथे १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!