Coronavirus : देशभरात २४ तासांत ५३ हजार ३७० नवे रुग्ण, ६५० जणांचा मृत्यू

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर

देशातील करोना प्रादुर्भावाचा वेग हळूहळू कमी होत असला, तरी अद्यापही नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. शिवाय, मृतांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ५३ हजार ३७० नवे करोनाबाधित आढळले, तर ६५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर पोहचली आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

देशातील एकूण ७८ लाख १४ हजार ६८२ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ८० हजार ६८० अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख १६ हजार ४६ जणांचा समावेश आहे.

२३ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,१३,८२,५६४ नमून्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. ज्यापैकी १२ लाख ६९ हजार ४७९ नमने काल तपासण्यात आले. आयसीएमआर कडून ही माहिती मिळाली आहे.

हे वाचले का?  पक्षपातावरून खडाजंगी; अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुल्लेखामुळे ‘इंडिया’ आघाडी आक्रमक

२३ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,१३,८२,५६४ नमून्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. ज्यापैकी १२ लाख ६९ हजार ४७९ नमने काल तपासण्यात आले. आयसीएमआर कडून ही माहिती मिळाली आहे.