Coronavirus – राज्यात आज दिवसभरात ३ हजार ५१३ जण करोनामुक्त

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७६ टक्के

राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. आज दिवसभरात राज्यात २ हजार ६२८ नवीन करोनाबाधित वाढले तर, ३ हजार ५१३ रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत राज्यभरात एकूण १९ लाख ५२ हजार १८७ जण करोनामुक्त झाल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७६ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यात ३३ हजार ९३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

पुणे शहरात आज दिवसभरात १९५ नवीन करोनाबाधितांची वाढ झाली. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ लाख ९२ हजार ८०२ झाली आहे. आतापर्यंत ४ हजार ७७४ रुग्णांचा करोननामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आज २२४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजअखेर शहरात १ लाख ८६ हजार ५३६ जण करोनामुक्त झाले आहेत.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

दरम्यान, आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. ” माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी करोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.”असं त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.