Coronavirus – राज्यात दिवसभरात ४ हजार ९२ करोनाबाधित रुग्णांची वाढ

१ हजार ३५५ जण करोनातून बरे झाले

राज्यातील करोना संसर्ग पुन्हा काहीसा वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ९२ करोनाबाधित रुग्ण वाढले. तर, १ हजार ३५५ जण करोनातून बरे झाले.

राज्यात आतापर्यंत १९ लाख ७५ हजार ६०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९५.७ टक्के झाले आहे. तर, राज्यात एकूण ३५ हजार ९६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut : “मी पुन्हा सांगतो मोठी गडबड…”, विधानसभेच्या निकालाबाबत संजय राऊतांचं विधान; म्हणाले, “हा कौल कसा…”

करोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातल्यानंतर जगभरात साथरोग आजारावरील संशोधनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. भारतात करोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद महाराष्ट्रात असून या पार्श्वभूमीवर पुणे औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. आगामी अर्थसंकल्पात या औंध साथरोग रुग्णालयाची घोषणा केली जाईल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्रात करोनाचे आजपर्यंत २० लाख ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले, तर ५१ हजाराहून अधिक रुग्णांचे मृत्यू झाले. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कितीतरी जास्त आहे.