Coronavirus: राज्यात दिवसभरात ५ हजारांहून अधिक जणांची करोनावर मात

रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ

महाराष्ट्राच मंगळवारी दिवसभरात करोनातून बरे झाल्याने एकूण ५ हजार ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.५४ टक्के इतका झाला आहे. राज्यात आज ३,०१८ नवे करोना रुग्ण आढळले. तर राज्यात आज ६८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर हा २.५६ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली.https://platform.twitter.com/embed/index.html?dnt=false&embedId=twitter-widget-0&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=1343914809989898246&lang=mr&origin=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra-news%2Fcoronavirus-maharashtra-state-update-dated-29-december-2020-informs-health-minister-rajesh-tope-vjb-91-2368140%2F&siteScreenName=loksattalive&theme=light&widgetsVersion=ed20a2b%3A1601588405575&width=550px

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

राज्यात आज 3018 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5572 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1820021 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 54537 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.54% झाले आहेआजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २६ लाख ७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २५ हजार ६६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २ लाख ८९ हजार ५६० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार २०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५४ हजार ५२७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३,०१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख २५ हजार ६६ झाली आहे.