Coronavirus : राज्यात दिवसभरात ८ हजार १० नवीन करोनाबाधित ; १७० रूग्णांचा मृत्यू

आज राज्यात ७ हजार ३९१ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे. राज्यात आज करोनामुक्त झालेल्यांपेक्षा जास्त संख्येने करोनाबाधित आढळून आले आहेत. दिवसभरात राज्यात ८ हजार १० नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ७ हजार ३९१ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.. याशिवाय, राज्यात आज १७० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,५२,१९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.१७ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४, ४८, २४, २११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१, ८९, २५७ (१३.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८१,२६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,०७,२०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.