Coronavirus In Maharashtra : दोन वर्षांत राज्यात प्रथमच करोना मृत्यू नाही ; ५४४ नवे रुग्ण

राज्यात दिवसभरात ३८ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची रुग्णसंख्या ४७७१ इतकी झाली आहे

मुंबई : करोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच दिवसभरात करोनामुळे राज्यात एकही मृत्यूची नोंद झाली नाही. याच कालावधीत ५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १ एप्रिल २०२० नंतर प्रथमच करोनामुळे राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

राज्यात दिवसभरात ३८ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची रुग्णसंख्या ४७७१ इतकी झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत मुंबई १००, उर्वरित पुणे जिल्हा ३९, पुणे शहर ६९, पिंपरी चिंचवड २४, नागपूर ८ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात सध्या ५,६४३ रुग्ण हे उपचाराधीन आहेत

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

मुंबईत सलग सहाव्या दिवशी दिलासा

मुंबई: बुधवारी शहरात पुन्हा एकदा शून्य मृत्यूची नोंद झाली असून गेले सहा दिवस सलग शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत मुंबईत १२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. याआधी जानेवारीत एकदा, फेब्रुवारीत ९ वेळा आणि मार्च महिन्यात दोन वेळा शून्य मृत्यू नोंद झाली आहे. बुधवारी शंभर नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून करोनाबाधितांचा एकूण आकडा १० लाख ५६ हजार ६४९ एवढा झाला आहे. तर १६८ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बुधवारी २० हजार ९८१ एकूण चाचण्या करण्यात आल्या असून सध्या ६८९ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के असून रुग्ण दुपटीचा दरही ५,४०५ दिवसांवर पोहोचला आहे

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड