Coronavirus update: रुग्णवाढीचा वेग मंदावला! २४ तासांत ८१६ रुग्णांचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून दिवसभरात आढळून येणाऱ्या करोना रुग्णसंख्येचा वेग मंदावल्याचं दिसत आहे. देशात शिरकाव केल्यानंतर सुरूवातील करोनाचा प्रसार नियंत्रित होता. मात्र शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेग वाढला. सप्टेंबरमध्ये करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. पण ऑक्टोबरच्या सुरूवातीपासून करोना रुग्णवाढ मंदावली आहे.

गेल्या २४ तासांतील रुग्णवाढीची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केली आहे. २४ तासांत देशभरात ६६ हजार ७३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ७१ लाख २० हजार ५३९ इतकी झाली आहे. यामध्ये ८ लाख ६१ हजार ८५३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ६१ लाख ४९ हजार ५३६ लोक बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्याही ८१६नं वाढून १ लाख ९ हजार १५० इतकी झाली आहे.

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन