आज १ हजार ५८६ रूग्ण करोनामधून बरे देखील झाले आहेत..
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यासाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. कारण, आज दिवसभरात राज्यात आढळून आलेल्या करोनाबाधितांची संख्या ही एक हजाराच्या खाली आली आहे. आज राज्यात ८८९ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १ हजार ५८६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, १२ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यातील करोना महामारीची दुसरी लाट आता ओसरली आहे. शिवाय, करोनामधून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. ही बाब निश्चतच राज्यासाठी दिलासादायक आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३७,०२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४७ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०३,८५० झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४००२८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१९,७८,१५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०३,८५० (१०.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,८३,०९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २३,१८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.