Covid 19 : राज्यातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आली दोन हजारांपेक्षा खाली ; रिकव्हरी रेट ९७.६६ टक्के

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

राज्यातील करोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्या आता कमी झाली आहे. आज (सोमवार) दिवसभरात राज्यात १ हजार ९६६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६५,२७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,४४,९१५ (१०.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४८,४०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ८१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ३९९४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

आजपर्यंत एकूण ८८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७५०७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १२९७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.