Covid -19 : राज्यात दिवसभरात ७ हजार ५६८ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९६.७६ टक्के

४ हजार ५०५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत.

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, मात्र तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या रूग्णसंख्येतही रोज भर पडतच आहे. दुसरीकडे रोज करोनातून मोठ्यासंख्येने रूग्ण देखील बरे होत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारकडून करोना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जात आहे.  दिवसभरात राज्यात ७ हजार ५६८ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ४ हजार ५०५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय ६८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५१,९५६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.७६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६३,५७,८३३ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात १,३४,०६४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली. तर सध्या राज्यातील मृत्यू दर २.१टक्के एवढा आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “यावेळी काहीतरी…”

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९७,२५,६९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,५७,८३३ (१२.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२१,६८३ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत, तर २,८९५ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.