COVID 19 : देशात मागील २४ तासात १ हजार ५४९ नवीन करोनाबाधित ; कालच्या तुलनेत १२ टक्के कमी

मागील २४ तासात ३१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, देशात २५ हजार १०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतात मागील २४ तासात करोना विषाणूचे एकूण १ हजार ५४९ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. जे काल आढळलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत १२ टक्के कमी आहेत. तर, ३१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २५ हजार १०६ अॅक्टिव्ह रुग्ण असून, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ०.४० टक्के आहे.

हे वाचले का?  ‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत

देशातील करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची एकूम संख्या ५१६५१० वर पोहोचली आहे. मागील २४ तासात २ हजार ६५२ जण करोनातून बरे झाले असून, रूग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) सध्या ९८.७४ टक्के आहे. आतापर्यंत एकूण ४२४६७७७४ जण करोनामुक्त झाले आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १८१.२४ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. मागील २४ तासांत २,९७,२८५ जणांना करोनाची लस देण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत ७८.३० कोटी लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे. तर मागील २४ तासात ३,८४,४९९ लोकाची करोना चाचणी झाली आहे.MORE STORIES

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा