Covid19: गेल्या २४ तासांत आठ महिन्यातील सर्वाधिक बाधितांची नोंद; रुग्णसंख्या तीन लाखांच्या पार

गेल्या २४ तासांत २ लाख २३ हजार ९९० रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

देशातील करोना रुग्णसंख्या स्थिर झाल्याचं वाटत असताना पुन्हा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात गेल्या आठ महिन्यांतील उच्चांकी करोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ३ लाख १७ हजार ५३२ बाधितांची नोंद करण्यात आली असून ४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच २ लाख २३ हजार ९९० रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

हे वाचले का?  Violence in Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, इम्फाळ जिल्ह्यात हायटेक ड्रोनने हल्ला; दोन जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

देशात सध्या १९ लाख २४ हजार ५१ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट सध्या १६.४१ टक्क्यांवर आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९३.६९ टक्क्यांवर आहे. गेल्या २४ तासांत देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात सध्या ओमायक्रॉनचे ९ हजार २८७ रुग्ण आहेत. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ओमायक्रॉन रुग्णांमध्ये ३.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

आतापर्यंत ३ कोटी ५८ लाख ७ हजार २९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, ४ लाख ८७ हजार ६९३ जणांना या जीवघेण्या आजारामुळे जीव गमवावा लागला. दुसरीकडे राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९.६७ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात तब्बल १९ लाख ३५ हजार १८० करोना चाचण्या करण्यात आल्या.