Davos 2023 : महाराष्ट्रात होणार ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; ‘एवढ्या’ लोकांना मिळणार रोजगार

मुख्यंमत्री, उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत ५ कंपन्यांशी सामंजस्य करार

स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

उदय सामंत यांनी सांगितलं की, “डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’मध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच, महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.”

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे,” अशी माहिती सामंत यांनी दिली. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या पंतप्रधानांचं महाराष्ट्राला आवाहन; नरेंद्र मोदी सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “आज महाराष्ट्र…”!