Devendra Fadnavis : “उमेदवारी दिलेली नसताना ज्यांनी अर्ज भरलाय…”, बंडखोरांसाठी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

Devendra Fadnavis on Maharashtra Election : बोरीवलीतून गोपाळ शेट्टींसह मुंबई आणि ठाण्यातील अनेक जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या नाराजीतून त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. याबाबत आज देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारांना आश्वासित केलं.
Devendra Fadnavis on Rebel Candidates : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत धुसफूस सुरू आहे. अनेक निष्ठावान पदाधिकाऱ्यांना संधी न देता आयारामांना संधी देण्यात आल्याने जुन्या-जाणत्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातूनच आघाडी आणि युतीत बंडखोरी करून इच्छूक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरलाय. तर काहींनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी आज सुचक वक्तव्य केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रवी राजा यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

हे वाचले का?  “शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”

बोरीवलीतून गोपाळ शेट्टींसह मुंबई आणि ठाण्यातील अनेक जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या नाराजीतून त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. याबाबत आज देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. एकमेकांच्या उमेदावारांविरोधात अर्ज भरण्यात आले आहेत. यासाठी आता नीती तयार केली आहे. ज्यांनी तिकिट नसताना उमेदवारी भरलीय त्यांना पक्षात परत घेण्याचा प्रयत्न तिन्ही पक्ष मिळून करणार आहेत. पक्षांतर्गतही काही उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांनाही विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना परत घेण्याचा प्रयत्न असेल.”

“उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छाननीही झाली असून अपेक्षित सर्व अर्ज वैध ठरले आहेत. दिवाळी दोन दिवस आहे. त्यानंतर ४-५ तारखेनंतर जोराने प्रचार सुरू होईल. त्याच्या पूर्ण तयारीत आम्ही आहोत”, असं नियोजनही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election Result Live Updates : राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सत्तास्थापनेचं घोडं कुठे अडलं?

गोपाळ शेट्टींचं काय करणार?

गोपाळ शेट्टी हे भाजपाचे अतिशय प्रामाणिक सैनिक राहिले आहेत. ते अनेक वेळा आग्रही असतात. शेवटी ते पक्षशिस्त मान्य करतात. त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. भाजपाच्या पाठी उभं राहण्याची भूमिका ते कायम घेतात, तशीच भूमिका ते आताही घेतील”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महायुतीचं सरकार येणार आहे

भाजपात येत्या काही दिवसात मोठे पक्षप्रवेश होतील. काँग्रेसचे ते नेते कोण हे मला विचारु नका. महायुतीचं सरकार हे सत्तेत येणार आहे. महायुती संदर्भात सकारात्मकता पाहण्यास मिळते आहे. नामांकन पूर्ण झालं आहे. त्यानंतर काही ठिकाणी क्रॉस फॉर्म आले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मी आणि महायुतीचे प्रमुख नेते होते. आमच्यातले सगळे इश्यू आम्ही संपवले आहेत. तुम्हाला त्याचं प्रत्यंतर आज आणि उद्या दिसेल.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”