DHFL Scam : ३४ हजार कोटी रुपयांच्या बॅंक फसवणूक प्रकरणी धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक

याप्रकरणी सीबीआयने २०२२ मध्ये धीरज वाधवान यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांच्यावर ३४ हजार कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीचे आरोप आहेत. अटकेनंतर त्यांना आज दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘द फायनान्शियल एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सायंकाळी धीरज वाधवानला यांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. याप्रकरणी सीबीआयने २०२२ मध्येच त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. महत्त्वाचे म्हणजे येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. मात्र, सध्या ते जामीनावर बाहेर होते.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

सीबीआयने २०२२ मध्ये एकूण १७ बँकांची ३४ हजार कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी २०१० ते २०१८ दरम्यान डीएचएफएलला ४२ हजार ७८१ कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी मिळून हेराफेरी केली आणि मे २०१९ पासून कर्जाचं पेमेंट डिफॉल्ट करून ३४ हजार ६१५ कोटी रुपयांची फसवणूक केली, असं सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात सांगण्यात आले होते.

हे वाचले का?  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार