Earthquake in Delhi : दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के, पाकिस्तान आणि चीनमध्येही हादरली जमीन

Earthquake in Delhi : पाकिस्तान आणि चीनमध्येही या भूकंपाचे हादरे बसले आहेत.

Earthquake in Delhi : भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. दिल्लीतल्या एनसीआर ते जम्मूपर्यंत हे धक्के जाणवले आहेत. दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी हे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाचं केंद्र जम्मू काश्मीरचं डोडा आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या झटक्यांची तीव्रता ५.४ इतकी नोंदवली गेली.

हे वाचले का?  SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?

श्रीनगरच्या एका व्यक्तीने भूकंपाविषयी सांगितलं की आज जे धक्के बसले ते तीव्र होते. जी मुलं शाळेत गेली होती ती घाबरली होती. गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसले आहेत. EMSC च्या माहितीनुसार किश्तवाडच्या ३० किमी अंतरावर असलेल्या दक्षिण पूर्व भागात हा भूकंप आला.

मार्च महिन्यातही बसले भूकंपाचे धक्के

याआधी मार्च महिन्यातही भारतातल्या काही राज्यांना भूकंपाचे धक्के बसले होते. त्यावेळच्या भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ६.६ इतकी नोंदवली गेली. दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हे झटके बसले होते. त्या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानातलं हिंदूकुश क्षेत्र होतं.