G20 Summit 2023: ‘पाश्चिमात्यांचा हेतू फोल’; रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून भारताचे कौतुक 

Delhi G20 Summit 2023 Updates युक्रेन मुद्दय़ावरून संपूर्ण शिखर परिषद ताब्यात घेण्याचा पाश्चिमात्य देशांचा हेतू आम्ही फोल ठरवला, अशी आक्रमक प्रतिक्रिया रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी रविवारी ‘जी-२०’च्या शिखर परिषदेच्या सांगता समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

नवी दिल्ली : G20 Summit Delhi 2023 दिल्लीतील ‘जी-२०’ समूहाची शिखर परिषद अत्यंत यशस्वी झाली. युक्रेन मुद्दय़ावरून संपूर्ण शिखर परिषद ताब्यात घेण्याचा पाश्चिमात्य देशांचा हेतू आम्ही फोल ठरवला, अशी आक्रमक प्रतिक्रिया रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी रविवारी ‘जी-२०’च्या शिखर परिषदेच्या सांगता समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दिल्ली घोषणापत्रात रशियाचा उल्लेख न झाल्याने संतुष्ट झालेल्या लाव्हरोव्ह यांनी भारताच्या ‘जी-२०’तील कामगिरीचे कौतुक केले.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

‘भारत मंडलम’मधील शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी, शनिवारी दिल्ली घोषणापत्र एकमताने स्वीकारण्यात आले. या घोषणापत्रामध्ये युक्रेन संघर्षांवर सहा परिच्छेद खर्ची घालण्यात आले असले तरी, रशियाचा थेट उल्लेख टाळण्याचा आला आहे. गेल्या वर्षी इंडोनेशियातील बाली शिखर परिषदेमधील घोषणापत्रात पाश्चिमात्य देशांच्या दबावामुळे युक्रेनविरोधात रशियाने युद्ध छेडल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दिल्ली घोषणापत्रात उल्लेख न केल्याने रशियाचे हितसंबंध जपले गेल्याचे मानले जात आहे. त्याची अप्रत्यक्ष कबुली  लाव्हरोव्ह यांनी पत्रकार परिषदेत दिली.