Good News: PF वर मिळणार ८.५ टक्के व्याज, अर्थ खात्याची दिवाळी भेट

पीएफ खातेधारकांना मिळणारे व्याज निश्चित करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारला

२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) खातेधारकांना मिळणारे व्याज निश्चित करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. मंत्रालयाच्या मंजुरीनंतर पीफ ठेवीवर खातेधारकांना ८.५ टक्के व्याज दिले जाईल. याचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सहा कोटींहून अधिक खातेदारांना होणार आहे. गेल्या वेळी २०१९-२० या आर्थिक वर्षात, KYC गडबडीमुळे अनेक ग्राहकांना व्याज मिळविण्यासाठी ८ ते १० महिन्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

कामगार सचिव सुनील बर्थवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की, “हे दिवाळीच्या भेटीसारखे आहे. लवकरच हा आदेश अधिसूचित करण्यात येणार आहे. सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करणारी ईपीएफओ कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येते, हे उल्लेखनीय आहे.”https://36feb7ad52a64189c453b3ae84b5247a.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

या वर्षी EPFO ​​च्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही, तो तसाच ठेवण्यात आला आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. तसेच कोविड महामारीमुळे गेल्या एका वर्षात EPFO ​​मध्ये योगदानापेक्षा जास्त पैसे काढले गेले आहेत. मार्च २०२० मध्ये पीएफवरील व्याजदर ८.६५ टक्क्यांवरून ८.५ टक्के करण्यात आला. सात वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. २०१२-१३ मध्ये पीएफवर याच दराने व्याज देण्यात आले होते.

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

घरी बसून चेक करा व्याजाची रक्कम

तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे आले आहेत की नाही हे देखील तुम्ही पाहू शकता. जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम आली नसेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. व्याजाची रक्कम पाहण्यासाठी तुम्हाला.

येथे तुम्हाला Register Grievance चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमच्या प्रोफाइलमधून  पीएफ मेंबर, ईपीएफ पेंशनर, एम्प्लायर, यापैकी तुमचा पर्याय निवडू शकता. तक्रारीसाठी तुम्हाला ‘पीएफ मेंबर’  निवड करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकून वैयक्तिक माहिती मिळवू शकता.