Gujarat Assembly Election: निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता

गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपत आहे. १८२ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत १११ आमदार भाजपाचे आहेत

गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातवर गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या मोरबी पूल दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून घेरलं जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबरला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्याचवेळी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, त्यावेळी आयोगानं या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत.

हे वाचले का?  Kolkata Rape Case : पीडितेच्या शरीरावर १४ जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव तर गुप्तांगात आढळला चिकट द्रव्य; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर!

जरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपत आहे. १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत १११ आमदार भाजपाचे आहेत. याशिवाय काँग्रेसचे ६२ आमदार आहेत. सामान्यत: हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एकत्रच तारखा जाहीर होऊन मतदान होत असतं. या परंपरेला यावर्षी फाटा देण्यात आला आहे.

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा

हिमाचल प्रदेशच्या निवडणुका अगोदर का?

हिमाचल प्रदेशमध्ये येत्या १२ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. हिमाचल प्रदेश या राज्यामधील बहुतांश प्रदेश हा डोंगराळ आहे. त्यामुळे हवामानाचा मुद्दा लक्षात घेता येथील निवडणूक कार्यक्रम अगोदर घोषित करण्यात आला आहे.

MORE STORIES ON

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!