IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला

IAS Pooja Khedkar Update : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पदाचा दुरूपयोग केल्यामुळे त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून बदली करण्यात आली. आता त्यांच्याशी संबंधित नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत.

IAS Pooja Khedkar : ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रवर्गातून यूपीएससी परीक्षेत यश मिळविणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्याबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर खेडकर यांनी स्वतंत्र कक्षाची मागणी, स्वतःच्या आलिशान गाडीला अंबर दिवा लावणे, वरिष्ठांचा कक्ष ताब्यात घेणे यासारख्या गोष्टी केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. आता त्यांनी एमबीबीएस च्या प्रवेशासाठीही ओबीसी नॉन क्रिमिलियेर कोट्याचा वापर केल्याची बाब समोर आली आहे.

पूजा खेडकर यांनी २००७ साली पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात ओबीसी भटक्या जमाती-३ या प्रवर्गातून प्रवेश घेतला होता. हा प्रवर्ग वंजारी जातीसाठी राखीव असून त्या याच प्रवर्गातून येत असल्याची माहिती सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला दिली. २०११-२०१२ या वर्षात पूजा खेडकर यांनी एमबीबीएसच्या प्रवेशासाठी ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रवर्गातून प्रवेश घेतला होता. त्यावेळी त्यांचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होते.

हे वाचले का?  नाशिक : नाल्यामुळे हर्षवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, पूजा खेडकर यांनी त्यावेळी प्रवेश परीक्षेत २०० पैकी १४६ गुण मिळवत खासगी महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. त्यावेळी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही परीक्षा घेतली जात नव्हती. पूजा खेडकर यांच्या दहावी आणि बारावीच्या गुणांचीही माहिती इंडिया टुडेने दिली आहे. शालेय नोंदीनुसार त्यांना दहावीला ८३ टक्के तर बारावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण मिळाले होते.

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”

पूजा खेडकर प्रकरण काय?

पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांची बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगातून (यूपीएससी) झाली आहे. नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या दोन प्रवर्गातून त्यांची निवड झाल्याचे शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे.

नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे, अशी अट आहे. मात्र, खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची ४० कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे दाखवले. त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेयरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबत बरीच माहिती समोर आणली होती.

पूजा खेडकर यांची संपत्ती किती?

  • IAS पूजा खेडकर यांच्याकडे ११० एकर शेतजमीन असल्याचे समोर आले आहे.
  • तसेच सहा प्लॉट्स आणि ७ फ्लॅट आहेत.
    ९०० ग्रॅम सोनं आणि हिरे आहेत.
  • त्यांच्याकडे १७ लाख रुपयांचे सोन्याचे घड्याळ आहे.
  • ऑडीसह चार आलिशान गाड्या आहेत. तसेच दोन खासगी कंपन्यात त्यांची भागीदारी आहे.
  • त्यांच्याकडे एकूण १७ कोटींची मालमत्ता आहे.
हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग