रोहित, पुजारा, पंत, रहाणे स्वस्तात माघारी
इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचे भरवशाचे फलंदाज पहिल्या सत्रात झटपट बाद झाले. रविचंद्रन अश्विनने ज्या फिरकीच्या जोरावर दुसऱ्या दिवशी इंग्लंडला उद्ध्वस्त केलं, त्याच फिरकीने तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना हादरवून सोडलं. चांगल्या लयीत असलेला चेतेश्वर पुजारा (८) कमनशिबी ठरला आणि धावबाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (१०), ऋषभ पंत (८) आणि अक्षर पटेल (७) यांची इंग्लंडच्या फिरकीपटूंचेनी शिकार केली. कर्णधार विराट कोहली (३५*) आणि रविचंद्रन अश्विन (३०*) यांनी सत्र संपेपर्यंत खेळपट्टीवर तग धरला आणि भारताला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली.