Ind Vs Eng 4th Test Update: इंग्लंडच्या बिनबाद ८० धावा; विकेट मिळवण्यासाठी भारतीय गोलंदाजांची धडपड

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यात दोन्ही संघानी १-१ ने बरोबरी साधली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यात दोन्ही संघानी १-१ ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात काय निर्णय येईल? याकडे लक्ष लागलं आहे.

मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूर (६० धावा) आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (५०) यांनी रचलेल्या बहुमूल्य शतकी भागीदारीमुळे चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या सामन्याचे तिन्ही निकाल शक्य असून इंग्लंडने सामना जिंकला तर ते मालिकेमध्ये आघाडी घेतील. भारताने सामना जिंकला तर मालिकेतील विजयाचं पारडं २-१ ने जड होईल. तर सामना अनिर्णित राहिल्यास पाचवा कसोटी सामना निर्णायक ठरेल. सध्याची सामन्याची स्थिती पाहता भारताचं पारडं जड वाटत असलं तरी इंग्लंडने यापूर्वी एवढी मोठी धावसंख्या करण्याचा पराक्रम केल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही तशी चिंताच आहे.

हे वाचले का?  Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा