IND vs PAK: अखेर पाकिस्तानी संघाला मिळाला व्हिसा, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला

Pakistan Team: पाकिस्तानचा संघ मॉरिशसमध्ये अडकला होता. मात्र, आता त्यांना भारताने व्हिसा मंजूर केला असल्याने सर्व चाहत्यांना भारत-पाकिस्तान या रंगतदार सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

SAFF Championship 2023: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील अनेक वादानंतर अखेर हायब्रीड मॉडेल अंतर्गत आशिया चषक खेळण्यावर सहमती झाली आहे. दोन्ही मंडळांनी ते मान्य केले आहे. याअंतर्गत ४ सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. भारत आपले सर्व सामने फक्त श्रीलंकेत खेळणार आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या एका टीमला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला आहे.

पाकिस्तान संघाला व्हिसा मिळाला

वास्तविक, दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF) चॅम्पियनशिप २१ जूनपासून भारतात सुरू होत आहे. यासाठी पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारतासोबतच पाकिस्तान, कुवेत आणि नेपाळचा संघ ‘अ’ गटात ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बांगलादेश, लेबनॉन, भूतान आणि मालदीव संघांचा ‘ब’ गटात समावेश आहे. भारतात होणारे सर्व सामने बंगळुरू येथील ‘श्री कांतीरवा’ स्टेडियमवर खेळवले जातील.

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

भारत सरकारकडून पाकिस्तानी संघाला व्हिसा मिळण्यास विलंब

माहितीसाठी की, पाकिस्तानचा संघ रविवारीच भारतात येणार होता पण व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे टीमला येण्यास उशीर झाला. सोमवारी संध्याकाळी पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यात आला. पाकिस्तान संघ मॉरिशसमध्ये आहे, तेथून ते बंगळुरूला रवाना होणार होते, परंतु व्हिसाला उशीर झाल्यामुळे तो येऊ शकला नाही. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा संघ मंगळवारी सकाळपर्यंत भारतात पोहोचेल.

हे वाचले का?  Germany Needs Indian Workforce: जर्मनीला भारतीय कामगारांची आवश्यकता का? भारतीयांसाठी जर्मनीने वाढवला ‘व्हिसा कोटा’

‘या’ दिवशी भारत-पाक सामना होणार आहे

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF) चॅम्पियनशिपचा सामना २१ जून रोजी बंगळुरू येथे होणार आहे. सायंकाळी ७.३० पासून ‘श्री कांतीरवा’ स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या स्पर्धेतील अनेक सामनेही दुपारी साडेतीन वाजल्यापासून होणार आहेत. प्रत्येक गटातील संघ एकमेकांशी एक-एक सामना खेळतील, तर या साखळी टप्प्यातील सामन्यांनंतर प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर असलेले संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचवेळी, ‘अ’ गटातील क्रमांक-१ संघाचा उपांत्य फेरीत गट ‘ब’ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी, तर ‘ब’ गटातील क्रमांक-१ संघाचा सामना अ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. यानंतर, दोन विजेत्या संघांमध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल, जो ४ जुलै रोजी होणार आहे.

हे वाचले का?  Supreme Court : बांगलादेशातून भारतात आलेल्या लोकांना ‘ओळख’ मिळणार? कलम 6 A बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तरी काय?