IPL 2020 : नरिन-रसेलमुळे कोलकाता अडचणीत?

आज  रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुशी सामना

शारजा : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुशी सामना करणारा कोलकाता नाइट रायडर्सचा संघ अडचणीत सापडला आहे. कोलकाताचे महत्त्वाचे फिरकी अस्त्र मानल्या जाणाऱ्या सुनील नरिनला संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीमुळे तंबी देण्यात आली आहे, तर तंदुरुस्तीमुळे आंद्रे रसेलच्या खेळण्याबाबत साशंका आहे.

कठीण प्रसंगात संघाला तारणाऱ्या नरिनवर गोलंदाजीची बंदी आल्यास कोलकाताला ते परवडणार नाही. गोलंदाजीत आपली भूमिका चोख बजावणारा नरिन फलंदाजीत मात्र झगडत आहे. शनिवारच्या सामन्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात जाहिरात फलकाला धडकल्यामुळे रसेलच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या दुखापतीचे स्वरूप पाहून खेळण्याचा निर्णय होऊ शके ल.

हे वाचले का?  Vinesh Phogat Hearing in CAS: विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने शनिवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किं ग्जविरुद्ध ३७ धावांनी आत्मविश्वास उंचावणारा विजय मिळवला आहे. कर्णधार विराट कोहलीने ५२ चेंडूंत नाबाद ९० धावांची खेळी साकारून सावधतेचा इशाराच जणू अन्य संघांना दिला आहे. युवा देवदत्त पडिक्कल, एबी डीव्हिलियर्स सातत्याने धावा करीत आहेत.

*  सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

हे वाचले का?  Nita Ambani on Olympics in India: नीता अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्ती चिदम्बरम म्हणाले, “हे तर मोठं संकट ठरेल”; वाचा नेमकं काय झालं?