IPL 2021 : “रावळपिंडी एक्सप्रेसपेक्षा भारी”; एनरिक नॉर्टजेने टाकला सर्वात वेगवान चेंडू

डेव्हिड वॉर्नरचला दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टजेने अक्षर पटेलच्या हाती झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते

बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली आणि पहिल्याच षटकात संघाने डेव्हिड वॉर्नरची विकेट गमावली. त्याला दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टजेने अक्षर पटेलच्या हाती झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नॉर्टजेने तुफानी वेगाने गोलंदाजी करून या स्पेलमध्ये एक अतिशय खास विक्रम केला आहे.https://9261c17df75964e043f8a7326d862f2b.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

एनरिक नॉर्टजे खरोखर वेगवान गोलंदाजी करू शकतो हे सर्वांना माहिती आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या हा वेगवान गोलंदाज १४० किमी वेगाच्या वर किती वेळ गोलंदाजी करु शकते याचे उत्तर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादकडे बुधवारच्या सामन्यातून दिलं आहे.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

नॉर्टजेने दुसऱ्या षटकात १४९.२ किमी प्रति तास, १४९.९ किमी प्रति तास, १५१.७ किमी प्रति तास, १४६.४ किमी प्रति तास, १४७.४ किमी प्रति तास आणि १४८.३ किमी प्रतितास अशी वेगवान गोलंदाजी करत सर्वांना अवाक केले. नॉर्टजेने दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू १५१.७१ किमी प्रतितास वेगाने टाकला, जो आतापर्यंतच्या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू आहे. त्याने त्याच्या पहिल्या दोन षटकांमध्ये १५० किमी प्रतितास वेगाने तीन चेंडू टाकले. त्याचा हा वेग पाहून वॉर्नर अस्वस्थ दिसत होता आणि नंतर त्याने आपली विकेट गमावली. वॉर्नरने नॉर्टजेकडून १४७ किमी प्रति तास वेगाने चांगल्या लांबीच्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅटच्या वरच्या भागावर चेंडू लागल्याने तो हवेत उंचावला आणि अक्षर पटेलच्या हातात गेला

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत टाकलेल्या १० सर्वात वेगवान चेंडूंपैकी अव्वल ७ हे नॉर्टजेनेच टाकले आहेत. त्यामुळे नॉर्टजेच्या या वेगवान गोलंदाजीवरुन त्याच्यावर ट्विटरवरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एनरिक नॉर्टजेने आगीच्या गोळ्याप्रमाणे सुरुवात केली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या १२ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. बुधवारी हैदराबादने दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांपुढे झुकत संपूर्ण संघाने निर्धारित षटकांत १३४ धावा केल्या. अब्दुल समदने संघासाठी २८ धावा केल्या.