IPL 2023: “मी ग्लोव्हज घातलेले म्हणजे…”, सुंदर झेल घेऊनही पुरस्कार न मिळाल्याने धोनी नाराज, पाहा Video

चेन्नईचा कर्णधार धोनीने या मोसमात शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने अफलातून झेलही घेतले आहे. त्यावरून त्याने मजेशीर प्रश्न विचारत मला अजूनही कोणीच अवॉर्ड दिला नाही.

आयपीएलच्या १६व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने पुरस्काराची मागणी केली, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. या सामन्यात कर्णधार एमएस धोनीने एक मोठा विक्रम केला. धोनीने झेल, स्टंपिंग आणि रनआऊट एकत्र करून आयपीएलच्या इतिहासातील विशेष द्विशतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील पहिला यष्टिरक्षक ठरला.

महेश तिक्षणाच्या गोलंदाजीवर धोनीने एडन मार्करामचा अप्रतिम झेल घेतला. यानंतर मयंक अग्रवाल यष्टिचित झाला आणि विकेटच्या मागे विजेचा वेग दाखवत त्याला तंबूत परतावे लागले. माहीनेही डावाच्या शेवटी अचूक थ्रो मारत वॉशिंग्टन सुंदरचा डाव संपुष्टात आणला. हे सर्व झेल घेतल्यानंतर धोनीने गंमतीने स्वत:साठी पुरस्काराची मागणी केली.

हे वाचले का?  Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा

एवढा शानदार झेल घेतला तरी मला पुरस्कार दिला नाही- धोनी

धोनीने सामन्यानंतर गंमतीने सांगितले की, “उत्तम झेल घेऊनही पुरस्कार मिळत नाही. फक्त तो यष्टिरक्षक आहे म्हणून, पण तो सोपा झेल नव्हता. याच्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगताना माही म्हणतो, “खूप वर्षांपूर्वी राहुल द्रविड यष्टीरक्षक असताना असेच काहीसे घडले होते. तुम्ही तुमच्या कौशल्याने असा झेल घेऊ शकत नाही. त्यासाठी खंबीरपणे उभे राहावे लागेल.”

“तरीही, त्यांनी मला सर्वोत्कृष्ट झेलचा पुरस्कार दिला नाही. मी अशा स्थितीत उभा होतो की तिथे झेल घेणे फार मोठी गोष्ट वाटत नाही. आम्ही ग्लोव्हज घालतो म्हणून लोकांना वाटते की ते सोपे आहे. मला वाटले की हा एक अप्रतिम झेल आहे,” #MSDhoni हर्षा भोगलेला म्हणाला.

हे वाचले का?  Tahawwur Rana Extradiction : २६/११ मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा डिसेंबर अखेरीस भारताच्या ताब्यात?

धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही

धोनीनेही विजयानंतर आपल्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणाबाबत उत्तरे दिली. तो म्हणाला की त्याला फलंदाजीसाठी पुरेशा संधी मिळत नाहीत, परंतु त्याची कोणतीही तक्रार नाही. चेन्नईच्या कर्णधाराने या मोसमात शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली. सहा सामन्यांच्या चार डावात त्याने ५९ धावा केल्या आहेत. यादरम्यान धोनीची सरासरी ५९ आणि स्ट्राइक रेट २१०.७१ आहे. त्याने दोन चौकार आणि सहा षटकार मारले आहेत.

काय घडलं सामन्यामध्ये?

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाला २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १३४ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १८.४ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने ५७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७७ धावांची खेळी केली.

हे वाचले का?  Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत

चेन्नईचा मोसमातील चौथा विजय

चेन्नईचा या मोसमातील सहा सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. संघाने दोन सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि लखनऊ सुपरजायंट्ससह त्यांचे समान गुण आहेत, परंतु राजस्थानची धावगती सर्वांमध्ये सर्वोत्तम आहे आणि यामुळे आरआर अव्वलस्थानी आहे. लखनऊ दुसऱ्या तर चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.