Israel and Hamas War: युद्ध आणखी भीषण होणार? इस्रायलचं लष्कर पुढच्या ४८ तासांत गाझा शहरात धडकणार!

Israel – Hamas Conflict Updates : हमासचं राज्य असलेल्या गाझा पट्टीचा भाग आता दोन विभागात विभागला गेला आहे.

गेल्या महिन्याभरापासून चालू असलेल्या इस्रायल- हमास यांच्या युद्धातील धग दिवसेंदिवस वाढत जात आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीवर सातत्याने हवाई हल्ले होत असून निर्वासित छावण्यांना लक्ष्य करण्यात आलंय. तसंच, येत्या ४८ तासांत लष्करी तुकड्या गाझा शहरात प्रवेश करणार असल्याचं वृत्त इस्रायल माध्यमांनी दिलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हमासचं राज्य असलेल्या गाझा पट्टीचा भाग आता दोन विभागात विभागला गेला आहे. उत्तर गाझा आणि दक्षिण गाझा अशी याची विभागणी झाली असून गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा गाझा पट्टी संपर्काबाहेर गेली आहे, अशी माहिती आयडीएफचे अधिकारी डॅनियल हगारी यांनी पत्रकारांना सांगितले.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

गाझा पट्टीवरील आक्रमणात अनेकांचा मृत्यू

इस्रयालने शनिवारी मध्यरात्री माघाझी निर्वासित छावणीमध्ये हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात जवळपास ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हमासच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

मृतांची संख्या किती?

गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ९७०० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, त्यापैकी ४००० हून अधिक मुले आणि अल्पवयीन आहेत. वेस्ट बँकमध्ये हिंसाचार आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये १४० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात १४०० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि २४२ लोकांना ओलिस बनवण्यात आले आहे.

हे वाचले का?  Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

सुएझ कालव्यात अमेरिकेच्या पाणबुड्या

अमेरिकेच्या लष्कराने मध्यपूर्वेत आण्विक सक्षम पाणबुडी तैनात केले आहे. अमेरिका लष्कराने रविवारी त्यांच्या ऑनलाइन स्टेटमेंटमध्ये इतर कोणतेही तपशील दिले नसले तरी काही फोटो जारी केले आहेत, ज्यात सुएझ कालव्याच्या पुलाजवळ एक पाणबुडी दिसतेय.