Israel – Hamas War : अमेरिकेकडून इस्रायलला तंबी, गाझा पट्टीबाबत दिला महत्त्वाचा इशारा

Israel – Hamas Conflict Updates : हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यानंतर गेला आठवडाभर इस्रायलची विमाने गाझा पट्टीवर अक्षरश: आग ओकत आहेत. गाझामध्ये सर्वत्र गोंधळाची स्थिती असतानाच रविवारी इस्रायलने गाझाचा उत्तरेकडील भाग रिकामा करण्याचे आदेश जारी केले.

Israel – Hamas News in Marathi : इस्रायलच्या लष्कर जमीन, हवाई आणि समुद्रामार्गे गाझामध्ये कारवाई सुरू करण्यासाठी सज्ज असून केवळ आदेशाची वाट पाहात असल्याचे जाहीर केले आहे. तसेच गाझाच्या साधारणत: उत्तरेकडील भागात राहणाऱ्या नागरिकांना तेथून बाहेर पडण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. त्यामुळे या भागात प्रचंड गोंधळाची स्थिती असून जीव वाचविण्यासाठी नेमके जायचे कुठे, असा प्रश्न गाझामधील २३ लाख नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गाझा ताब्यात घेण्याविरोधात इशारा दिला आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये २९ अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यानंतर गेला आठवडाभर इस्रायलची विमाने गाझा पट्टीवर अक्षरश: आग ओकत आहेत. गाझामध्ये सर्वत्र गोंधळाची स्थिती असतानाच रविवारी इस्रायलने गाझाचा उत्तरेकडील भाग रिकामा करण्याचे आदेश जारी केले. गाझाच्या उत्तर भागात हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यापूर्वी रहिवाशांना तेथून हलवण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

दरम्यान, इस्रायल-हमास युद्धात अमेरिकेने इस्रायलची बाजू घेतली आहे. परंतु, गाझावर पूर्णपणे कब्जा न करण्याचा इशारा इस्रायलला दिला आहे. जो बायडन यांनी सीबीएस न्युजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, गाझा पट्टी ताब्यात घेणं ही इस्रायलसाठी मोठी चूक ठरू शकेल. हमास संघटना ही पॅलेस्टिनी नागरिकांचं प्रतिनिधित्व करत नाही. त्यामुळे गाझा पुन्हा ताब्यात घेणं इस्रायलची चूक ठरू शकेल. तसंच, गाझामधून अतिरेक्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यामुळे युद्ध नियमांची काटेकोर अंमलबजावणी इस्रायलकडून होईल, अशी आशा आहे.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्रायल दौऱ्यावर जाणार?

दरम्यान,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येत्या काही दिवसांत इस्रायलच्या दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहेत. दौऱ्याची योजना अद्याप निश्चित झालेली नसली तरी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बायडन यांना solidarity visit साठी आमंत्रित केले आहे, त्यामुळे ते इस्रायलला जाण्याची शक्यता आहे.

गाझापट्टीवर मानवतावादी संकटे

युद्धामुळे गाझामध्ये गंभीर मानवतावादी संकटे निर्माण झाली आहेत. रुग्णालये जखमींनी खचाखच भरलेली आहे. तर, इंधन आणि इतर मुलभूत पुरवठ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. इस्रायलने गाझावरील वीज, इंधन, अन्न, वस्तू आणि पाणीपुरवठा खंडित केला आहे.

मृतांची संख्या वाढली

इस्रायल-हमास युद्धात मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून सोमवारी मृतांची संख्या ४ हजारच्या वर गेली आहे. इस्रायलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की हमासच्या हल्ल्यात १४०० हून अधिक लोक मारले गेले, तर गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की इस्रायली क्षेपणास्र आणि गोळीबारात २६७० पॅलेस्टिनी ठार झाले आणि ९६०० जण जखमी झाले.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार