Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

इस्रायल आणि इराणमध्ये आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता भारताने इराणमध्ये राहणाऱ्यांनी भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

Israel Iran War: इस्रायल आणि इराणमध्ये आता संघर्ष पेटला असून मंगळवारी (१ ऑक्टोबर) रात्री इराणने इस्रायलची राजधानी तेल अविववर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी देखील इराणला मोठा इशारा दिला आहे. इराणने आमच्यावर क्षेपणास्त्र डागून गंभीर चूक केली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा इस्रायलने दिला आहे. त्यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता भारताने इराणमध्ये राहणाऱ्यांनी भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

अ‍ॅडव्हायजरीमध्ये काय म्हटलं?

इस्रायल आणि इराणमधील संघर्षाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मात्र, भारतीय नागरिकांनी इराणमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळवा. तेथे राहणाऱ्यांनी सतर्कता बाळगावी. काही आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांनी भारतीय दूतावासांशी हेल्पलाइनशी संपर्क साधावा. याबरोबरच काही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभमीवर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असं भारतीय दूतावासांनी अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे.

इस्रायलने इराणला काय इशारा दिला?

इराणने इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच इस्रायलमध्ये आप्तकालीन सायरन वाजविण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं आहे. इराणने इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी इराणने आमच्यावर क्षेपणास्त्र डागून चूक केली. त्यामुळे आता इराणने परिणामांसाठी तयार राहावं, असा इशारा इस्रायलने दिला आहे. दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायल व्याप्त वेस्ट बँक येथील एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला. दरम्यान, इराणच्या हल्ल्यामुळे मध्य पूर्व आशियातील हिंसक वातावरणात आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार