ISRO ची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाला अनोखी भेट, दुसरी अवकाश दुर्बिणी XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण

अवकाशातील एक्सरे (X-rays)च्या स्रोतांचा वेध घेणाचे काम ही अवकाश दुर्बिणी करणार आहे.

२०२४ वर्षाची दमदार सुरुवात इस्रोने केली आहे. २०२३ ला अलविदा करत २०२४ चे स्वागत करतांना पहिल्याच दिवशी म्हणजेच सूर्य माथ्यावर येण्यापूर्वीच इस्रोने XPoSat नावाची अवकाश दुर्बिण नऊ वाजून ३० मिनिटांनी प्रक्षेपित केली. पृथ्वीपासून सुमारे ६५० किलोमीटर उंचीवर XPoSat ही ४६९ किलोग्रॅम वजनाची दुर्बिण यशस्वीपणे प्रक्षेपित केली.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल

या XPoSat वर Polarimeter Instrument in X-rays (POLIX) आणि X-ray Spectroscopy and Timing (XSPECT) अशी दोन वैज्ञानिक उपकरणे आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून अवकाशातील एक्स रे – X-rays म्हणजेच क्ष किरणांच्या उगमांच्या स्त्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे कृष्ण विवर – black hole तसंच न्यूट्रॉन तारे (neutron star) यांचा सखोल निरिक्षणे केली जाणार आहेत, याबद्दलची नवी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यानिमित्ताने भारतासह जगभरातील अवकाश संशोधनाला मोठी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या पंतप्रधानांचं महाराष्ट्राला आवाहन; नरेंद्र मोदी सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “आज महाराष्ट्र…”!

यानंतर संवाद साधतांना देशाला नववर्षाच्या शुभेच्छा देतांना २०२४ हे वर्ष इस्रोसाठी अनेक मोहिमांसाठी असेल असं अध्यक्ष एस सोमनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. २०२५ मध्ये इस्रो भारतीय अंतराळवीर गगनयान (Gaganyaan) मोहिमेद्वारे अवकाशात पाठवणार आहे, या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग असलेल्या गगनयान एक आणि दोन अशा मानवविरहित मोहिमा याचवर्षी होणार असल्याची माहिती सोमनाथ यांनी यावेळी दिली. तसंच विविध उपग्रहांचे, वैज्ञानिक उपकरणांचे प्रक्षेपणही यावर्षी केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.