Khalida Zia : बांगलादेशात राजकीय घडामोडींना वेग; शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी तुरुंगातून सुटणार!

Khalida Zia To Be Out Soon : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया लवकरच तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

Khalida Zia To be Out Soon : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून त्यांची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. दरम्यान, त्यांनी बांगलादेशातून पलायन केल्यानंतर त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या खालिदा झिया यांना ताबडतोब तुरुंगात मुक्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचं लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान यांनी सांगतिलं.

दोनवेळा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिलेल्या ७८ वर्षीय खालिदा झिया यांच प्रकृती सध्या नाजूक आहे. २०१८ साली त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख आणि बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी पक्षासह अनेक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते यांची राष्ट्रपतींबरोबर बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पत्रकार संघाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की शहाबुद्दीन यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत “बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांना ताबडतोब मुक्त करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला”.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

खलिदा झिया यांच्यावर काय आरोप होते?

शेख हसीना आणि खालिदा झिया यांच्यात दीर्घकालीन शत्रूत्व आहे. अधिकारांचा गैरवापर करून खालिदा झिया यांनी अनाथाश्रमाच्या ट्रस्टसाठी देणग्यांमध्ये अडीच लाख डॉलरचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आहे. बीएनपीने असे म्हटले आहे की हे खटले बनावट आहेत आणि झिया यांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा उद्देश आहेत. परंतु, शेख हसीना सरकारने आरोप नाकारले. “विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व लोकांना मुक्त करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे,” असे अध्यक्षांच्या निवेदनात म्हटले आहे.