Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 Live Updates गणेश विसर्जनाचा अनोखा उत्साह मुंबईत पाहण्यास मिळतो. लालबागचा राजा २० तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे.

Mumbai Ganesh Visarjan 2024 Live : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईकर, पुणेकर रस्त्यावर येऊन मिरवणूक काढत असतात. मुंबईतली विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरु आहे. लालबागचा राजा आणि इतर गणपती यांची ही मिरवणूक सुरु आहे. मुंबईतल्या गिरगाव, जुहू या चौपाट्यांवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. महाराष्ट्रातही अनंत चतुर्दशी साजरी करण्यात आली. अनेक शहरांमध्ये कृत्रीम तलाव तयार करण्यात आले होते. या तलावांवर जाऊन नागरिकांनी घरगुती गणेशाचं विसर्जन करत पुढच्या वर्षी लवकर या असा गजर केला. आज विसर्जन मिरवणुकीचा दुसरा दिवस आहे. जाणून घेऊ सगळे अपडेट्स

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

मुंबईत लालबागच्या राजासह गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरुच, पुण्यात मानाच्या गणपतींना निरोप

आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईकर, पुणेकर रस्त्यावर येऊन मिरवणूक काढत असतात. मुंबईतली विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरु आहे. लालबागचा राजा आणि इतर गणपती यांची ही मिरवणूक सुरु आहे.