Latest Russia-Ukraine War News : अमेरिकेकडून युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्र पुरवठा

युक्रेनच्या दोन्बस प्रदेश ताब्यात घेण्याचे रशियाचे प्रयत्न रोखण्यासाठी युक्रेनची धडपड सुरू आहे.

वॉशिंग्टन : युक्रेनला अत्याधुनिक मध्यम श्रेणी रॉकेट प्रणाली पाठवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला.

युक्रेनच्या दोन्बस प्रदेश ताब्यात घेण्याचे रशियाचे प्रयत्न रोखण्यासाठी युक्रेनची धडपड सुरू आहे. अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे ‘आगीत तेल ओतण्या’चा प्रकार असल्याची टीका रशियाने केली आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की युक्रेनच्या संरक्षण सहाय्यासाठी अमेरिकेने मंजूर केलेल्या ७० कोटी डॉलरच्या मदतीचा भाग म्हणून हेलिकॉप्टर, रणगाडाविरोधी शस्त्र प्रणाली, अत्याधुनिक क्षेपणास्त्र-रॉकेट प्रणाली पुरवली जाणार आहे. प्रशासनाकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. अध्यक्ष बायडेन यांनी सोमवारी सांगितले होते, की आम्ही युक्रेनला रशियाला लक्ष्य करणारी लांब पल्ल्याची रॉकेट यंत्रणा पाठवत नाही. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव यानी या निर्णयाचे स्वागत केले होते.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित