Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीतील काळ्या पैशांवर ‘वॉच’, ११ निवडणुकीत ३४०० कोटींची रक्कम जप्त

गेल्या पाच वर्षांत काळा पैसा जप्त करण्यात वाढ झाली आहे.

Lok Sabha Nivadnuk 2024 Schedule : देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याआधी त्यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. देशात ९६ कोटी मतदार असून ५ लाख मतदान केंद्र आहेत. तर १.५ कोटी निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली. तसंच, या निवडणुकीतील चार आव्हानेही त्यांनी स्पष्ट केली. मसल (गुन्हेगारी), मनी (पैसा), Missinformation (चुकीची बातमी), MCC Violetions (आचारसंहितेचा भंग) ही आव्हाने सांगताना त्यांनी यावेळी गेल्या ११ विधानसभा निवडणुकीत ३४०० कोटींची रोकड जप्त केल्याची माहिती दिली.

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा

२०२२-२३ च्या निवडणूक काळात, पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत ११ राज्यांमध्ये रोख जप्तीचे प्रमाण ८०० टक्केपेक्षा जास्त वाढले आहे. या काळात ३ हजार ४०० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसंच, अंमलबजावणी एजन्सींना बेकायदेशीर पैसे, दारू, ड्रग्ज आणि मोफत वस्तूं वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अंमलबजावणी यंत्रणांना कोणते निर्देश?

  • दारू, रोख रक्कम, फ्रीबीज, ड्रग्सचे वितरणावर लक्ष ठेवणे.
  • मोफत वस्तूंच्या बेकायदेशीर वितरणावर कारवाई करणे
  • बेकायदेशीर ऑनलाइन रोख हस्तांतरणावर कडक ठेवणे
  • सूर्यास्तानंतर बँकेच्या वाहनांमधून रोकड नेण्याऱ्यावंर कारवाई
  • अनुसूचित नसलेल्या चार्टर्ड फ्लाइटची देखरेख आणि तपासणी
हे वाचले का?  काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला आक्रमक, पाकिस्तानला इशारा देत म्हणाले…