LPG Gas Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; आता किती रुपयांना मिळणार सिलिंडर? असे आहेत नवे दर!

आजपासून गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LPG Price in Maharashtra Today, 1 July 2024 : आजपासून गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर ३० रूपयांनी स्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळला आहे. आता १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज (१ जुलै) सकाळी बीपीसीएल आणि एचपीसीएल गॅस सिलिंडरचे दर मी करण्याची घोषणा केली आहे. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली असली तर घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

हे वाचले का?  Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

व्यावसायिक गॅस सिलिंडर ३० रूपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतल्यानंतर आता दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलिंडर १,६४६ रुपयांना मिळणार आहे. आधी तोच गॅस सिलिंडर १,६७६ रुपयांना मिळत होता. तसेच मुंबईत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १,६२९ रुपये होती. आता १,५९८ रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये १,७५६ रुपयांना आता गॅस सिलिंडर मिळणार आहे. आधी त्याची किंमत १७८७ रुपये होती. तसेच चेन्नईमध्ये १,८०९ रुपयांना सिलिंडर मिळणार आहे.

हे वाचले का?  त्रुटींसाठी निकष लावा, सुविधा द्या! केंद्राच्या उच्चस्तरीय परीक्षा सुधारणा समितीकडे सूचनांचा ओघ

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती स्वस्त करण्यात आल्या असल्या तरी घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. सध्या घरगुती स्वयंपाकाचे सिलिंडर दिल्लीत ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, तर मुंबईत ८०२ रुपये, चेन्नईमध्ये ८१८ रुपयांना आहेत.

दरम्यान, सर्वसामान्यांसाठी खर्चाचे नियोजन करण्यासाठी पगाराची १ तारीख महत्त्वाची असते. या १ तारखेला दर महिन्यात काही गोष्टी स्वस्त होतात तर काही गोष्टी महाग होतात. आता या १ जुलैला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३० रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचले का?  भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचा ध्यास; दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन