Maharashtra Assembly Budget Session 2024-2025 Live: महाराष्ट्र अर्थसंकल्पासह महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!
Vidhan Sabha Monsoon Session Live, Maharashtra Budget 2024: अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीदेखील सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजपा, शिवसेना व अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी कंबर कसून कामाला लागण्याचे निर्देश आपल्या राज्यातील पक्षसंघटनेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. त्याचवेळी राज्यातील मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही या अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.