Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या पंतप्रधानांचं महाराष्ट्राला आवाहन; नरेंद्र मोदी सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “आज महाराष्ट्र…”!

राज्यातील ९९० संवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला असून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Assembly 2024 Voting Updates : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पाडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील प्रत्येक केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मतदारांसाठी मराठीतून एक्स पोस्ट केली आहे.

गेले महिनाभर कर्णकर्कश प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असले तरी मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

राज्यातील ९९० संवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला असून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील एक लाख ४२७ मतदान केंद्रांपैकी ६७,५५७ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे एक लाखाहून अधिक समजाकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी ८६ हजार ४६२ अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना गृह मतदानांची सुविधा देण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे वाचले का?  संसदेत पहिला दिवस गोंधळाचा; दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभेचा गोंधळ टाळण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत मुंबईत मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ झाला होता. मतदान केंद्रांवर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मतदानासाठी मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले होते. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यात लोकसभेच्या तुलनेत सुमारे दोन हजार मतदान केंदांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर मतदारांना ताटकळत बसावे लागू नये म्हणून एका वेळी एकापेक्षा अधिक मतदारांना मतदान केंद्रात सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…