Maharashtra Assembly Session: “महाराष्ट्राचे प पू…,” ‘युवराजांची ‘दिशा’ चुकली’, शिंदे गटातील आमदारांची आदित्य ठाकरेंवर टीका

आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करुन बसलेलं दाखवत सत्ताधारी आमदारांची टीका

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून बुधवारी आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने वाद विकोपाला पोहोचला होता. विरोधकांकडून होणाऱ्या आंदोलनांमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभाग घेत असल्याने सत्ताधारी आमदारांकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच आज आमदारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवणारं बॅनर हातात घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरुन त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या पोस्टरमध्ये ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पू) युवराज’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत घोषणा दिल्या. या बॅनरवर आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करुन बसलेलं दाखवण्यात आलेलं असून, हिंदुत्वाऐवजी महाविकास आघाडीकडे प्रवास करत असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. तसंच ‘युवराजांची दिशा चुकली’ अशी टीकाही करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

बॅनरवर काय लिहिलं आहे –

या बॅनरमधून आदित्य ठाकरेंवर काही गंभीर आरोप आणि टीका करण्यात आली आहे. २०१४ ला १५१ चा हट्टा धरुन युती बुडवली. २०११ ला खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली असा आरोप आदित्य ठाकरेंवर करण्यात आला आहे. तसंच घरात बसून पर्यटन खातं चालवलं आणि सत्ता गेल्यावर पर्यटनाची लहर आली अशी टीका केली आहे. पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन आणि स्वत: आमदार होण्यासाठी महापौर आणि दोन आमदारांची लागते कुशन असंही त्यात म्हटलं आहे. सत्तेत असताना शिवसैनिकांना तडीपार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange : “बेगडी उपोषण करण्यापेक्षा…”, आंदोलन स्थगित करताना मनोज जरांगे असं का म्हणाले?

शिंदे गटाचा इशारा

“त्यांनी तीन दिवस घोषणाबाजी केली, आम्ही दोनच दिवस घोषणा दिल्या असून, त्यांच्या वर्मी लागलं आहे. कोण काही विचारतंय का याची आम्ही वाट पाहत होतो, पण कोणी काही विचारलं नाही. प्रत्येकाने आपली मर्यादा राखली पाहिजे. आम्हाला डिवचू नका, आम्ही काही करणार नाही. पण काही केल्यास आम्ही हात बांधून बसणार नाही. बाळासाहेबांनी सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं. आमची काही चूक असेल तर दाखवून द्या, माफी मागू. पण उगाच सहन करणार नाही. आम्हाला कोणाच्या घरापर्यंत जाण्याची गरज नव्हती. तुम्ही शिस्त पाळल्यास, आम्हीदेखील पाळू, उगाच आम्ही डिवचणार नाही,” असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange : “आरक्षण घेण्यासाठी आता एकच पर्याय”, मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, “सत्तेत…”