Maharashtra Assembly Special Session Live : लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची पुन्हा छाननी होणार का? आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती!

Maharashtra Politics Live Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर.
राज्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन चालू झाले आहे. आज या अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून जवळपास सर्व आमदारांनी शपथ घेतली. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यांनी कालच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. त्यांची या पदाकरता बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला आहे. तसंच, महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज बेळगावात महाअधिवेशन आहे. कर्नाटक पोलिसांनी या अधिवेशनाला परवानगी नाकारली आहे. परंतु, महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशनावर ठाम असल्याने कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  पैठणी व्यावसायिकाची एक कोटीपेक्षा अधिक रुपयांना फसवणूक

Maharashtra Live News : लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची पुन्हा छाननी होणार का? आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती!

दोन कोटी ४० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. छाननी कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येने करण्यासाठी तक्रार यावी लागते. मी आता त्या विभागाची मंत्री नाही. तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे माहिती नाही. छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते. मी मंत्री असताना तक्रारी आल्या नव्हत्या. कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात. आता तक्रारी आल्यात की यासंदर्भातील माहिती नाही. अतिशय प्राथमिक छाननी करून आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले आहेत – आदिती तटकरे

हे वाचले का?  PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण