Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates : राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी बिनविरोध निवड

Maharashtra Assembly Winter Session Updates, Day 4 : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी गाजत आहे. अशात आज विधानसभा आणि विधान परिषदेत काय काय घडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी गाजत आहे. अशात आज विधानसभा आणि विधान परिषदेत काय काय घडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान १६ डिसेंबर रोजी सुरू झालेले हे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

हे वाचले का?  “ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…”, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…

सध्या नागपूरमध्ये सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे. यामध्ये प्रामुख्याने बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारावर विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

दुसरीकडे आज रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांसाठी बौद्धिकाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपासह शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते आणि आमदार दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे (अजित पवार) राजू कारेमोरे हे एकमेव आमदार रेशीमबागेत गेले आहे. उममुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाही या बौद्धिकाला दांडी मारल्याचे पाहायला मिळत आहे.

हे वाचले का?  राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता आठवडा होत आला आहे. अशात आज नव्या मंत्र्यांना खातेवाटप होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यासह हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी.