Maharashtra Breaking News Live : मराठा ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

Marathi News Live Updates : राज्यातील प्रत्येक बातमी जाणून घ्या

Maharashtra News Live Updates, 06 August 2024: मराठा ठोक मोर्चातर्फे आज मुंबईत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट होत असताना तिकडे धाराशिवमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये आरक्षणावर चर्चा झाली. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आता ओबीसींची बाजू उचलून धरली असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्र सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विरोधक आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगतिले जाते.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

तसेच आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. या सर्व घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.