Maharashtra Breaking News Live: “महाराष्ट्रात उबाठा वाजत- गाजत…”, भाजपा नेत्याची बोचरी टीका

Mumbai Update, I.N.D.I.A Meeting Live News : राज्यातील राजकीय घडामोडी, हवामानाचा अंदाज आणि इतर सर्व अपडेट्स वाचा.

Mumbai Maharashtra Live Today, 31 August 2023: भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला २८ राजकीय पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

दुसरीकडे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी, प्रवरानगर दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही नेते प्रवरानगर येथील ‘राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच आज मुंबईत जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाणार आहे. नीती आयोगाच्या बैठकीतील निर्णयावरून शरद पवार गट आक्रमक झाला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर वाचा…

हे वाचले का?  CM Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी आधी उरली सुरलेली शिवसेना…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका