Maharashtra Political Crisis Live, Shinde vs Thckeary : राज्यातील राजकारण, न्यायालयीन घडामोडी आणि अन्य बातम्या वाचा एकाच ठिकाणी.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात ‘एनआयए’ने महाराष्ट्रासह देशात १५ ठिकाणी छापेमारी करत सुमारे १०६ ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मंगळवारी केलेल्या कारवाई एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर केंद्र सरकारने मोठं पाऊल उचचलं असून ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी घातली आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासोबतच केंद्र सरकारने रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अँड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घातली आहे.
दुसरीकडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात तर्क-वितर्क लावले जात आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांसह भाजपाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिली जात आहे.
या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर