Marathi Breaking News Today. 30 August 2022 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर!
Maharashtra News Live Updates : राज्यात एकीकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार, याची उत्सुकता असताना दुसरीकडे दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगू लागलं आहे. आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर देखील हक्क सांगणाऱ्या शिंदे गटाकडून आता दसरा मेळावा आमचाच होणार, असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेकडून देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आमचाच होणार अशी भूमिका मांडली जात आहे. मात्र, या दोघांवर टीका करत मनसेकडून मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मनसेकडून शिवसेना आणि शिंदे गट या दोघांना खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे.
म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार यापुढे सोडतीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन जमा करावी लागणार आहेत. त्याशिवाय अर्ज भरताच येणार नाही. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरणारेच सोडतीत समाविष्ट होऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे पात्रता आधीच निश्चित झाल्याने विजेत्यांना थेट देकार पत्र देण्यात येणार आहे. सोडत प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि नव्या पद्धतीमुळे सोडत १०० टक्के पारदर्शक होईल, दावा करण्यात येत आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई मंडळाने म्हाडा प्राधिकरणाला सादर केला आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
LIVE UPDATES
Maharashtra Live News Today, 30 August 2022 : दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं; मनसेची शिवसेना, शिंदे गटावर टीका
SortLatestOldest
12:25 (IST) 30 Aug 2022
गडचिरोली : पैशाच्या वादातून वडिलाने घेतला मुलाचा जीव; गोळी झाडून केली हत्या
भामरागड तालुक्यातील धुळेपल्ली येथे मजुरीच्या पैशांवरून झालेल्या वादात वडिलाने अंगणात झोपलेल्या मुलावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. रानू आत्राम (३२) असे मृत मुलाचे नाव आहे. कोपा वंजा आत्राम (६०) असे आरोपी पित्याचे नाव असून ताडगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गोंदिया : आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरण अभियंत्याच्या कानशिलात लगावली
गोंदिया शहरालगतच्या ग्राम मुर्री येथील एका ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल भलतेच संतापले. संतापाच्या भरात त्यांनी ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांच्या कानशिलात लगावली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आणखी पाच विभागप्रमखांची नियुक्ती
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईत पक्षबांधणी करण्याची जबाबदारी पाच विभागप्रमुख आणि तीन विभाग संघटकावर सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात माजी आमदार, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अशोक पाटील आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
- … आणि भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मुंबईतील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाअंतर्गत मंगळवारी प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखविला आणि सारिपूत ते मरोळ अशी तीन किमीचा पल्ला या मेट्रो गाडीने गाठला.