Maharashtra Breaking News Live: “आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!

Mumbai Live News Updates: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Maharashtra Budget Session Live Updates, 24 March 2023: राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर २४ तासांच्या आत पालिका प्रशासनानं माहीमच्या समुद्रातील बांधकाम हटवलं आहे. त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर दुसरीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस आता शिल्लक असून त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचले का?  Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्डेट करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत. आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो. आमचा पक्ष स्वत:च्या पायावर उभा आहे. दुसऱ्याची डोकी आम्हाला कामासाठी लागत नाहीत –

काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची हानी एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी त्यांनी जे काही केलं, त्यामुळे झाली. काँग्रेससारखा राष्ट्रव्यापी पक्ष अनेक ठिकाणी पराभूत झाला. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी लढा दिलेला, ते उद्धव ठाकरे संपूर्णपणे विसरले आहेत. कुणाच्या पाठी किती धावायचं, याच्या मर्यादाही त्यांनी सोडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीही बोलण्याची माझी तयारी नाही – दीपक केसरकर

हे वाचले का?  Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू