Maharashtra Breaking News Live : “मनुस्मृतीतील काही श्लोक पाठ्यपुस्तकात देणार”, केसरकरांच्या विधानावर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

Maharashtra Political News Live Today, 29 May 2024 : राज्यातील राजकारण, समाजकारण, वातावरण, हवामान अपडेट्स, लोकल अपडेट्ससह सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

Live News Update Today : राज्यातील राजकीय आणि हवामानाचं तापमान दिवसेंदिवस वाढत जातंय. सूर्य डोक्यावर आग ओकतोय तर, दुसरीकडे ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत असल्याने याप्रकरणी अंतिम निकाल काय लागले याकडे सर्वांचं लक्ष आहे. या अपघातामुळे पुण्यातील ससून रुग्णालयातील गैरकारभारही चव्हाट्यावर आला आहे. तर दुसरीकडे पावसाअभावी अनेक तलाव, धरणे कोरडे पडले असून मुंबईसह अनेक भागात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. या जिल्ह्यांमध्ये सरकारकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरीही तो अपुरा आहे. त्यामुळे बळीराजासकट सर्वचजण आता पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

हे वाचले का?  Devendra Fadnavis : “मेरी हिम्मत परखने की गुस्ताखी मत करना”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना शायरीतून प्रत्युत्तर