Maharashtra Corona Update : राज्यात रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदर देखील वाढला; २४ तासांत १९७ मृतांची नोंद!

गेल्या महिन्याभरात राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी झाली असली, तरी अजूनही ती ९ ते १० हजारांच्या घरात आहे. तर मृत्यूदर देखील २ टक्क्यांवर गेला आहे.

महाराष्ट्र सरकारने ५ टप्प्यांमध्ये लॉकडाउनच निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू केल्यापासून राज्यात दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा सातत्याने बदलताना दिसत आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात जो मृतांचा आकडा १६३ होता, तो वाढून गुरुवारी १९७ झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख १९ हजार ८५९ इतका झाला असून राज्याचा मृत्यूदर २ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गुरुवारच्या या आकडेवारीनुसार मृत्यूदर गेल्या १५ ते २० दिवसांमध्ये १.९५ वरून २ टक्क्यांवर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ही प्रशासनासाठी चिंतेची बाब कायम राहिली आहे. त्यातच करोनाच्या नव्या Delta Plus Variant मुळे आरोग्य प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात ९ हजार ८४४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंत करोनाबाधित झालेल्या नागरिकांचा आकडा आता ६० लाख ७ हजार ४३१ इतका झाला आहे. यामध्ये १ लाख २१ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात ९ हजार ३७१ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रुग्णांचा राज्यातला आकडा ५७ लाख ६२ हजार ६६१ इतका झाला आहे. त्यापाठोपाठ राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९५.९३ टक्के इतका झाला आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई महानगर पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात आज दिवसभरात ७८९ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे शहरातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ७ लाख २४ हजार ११३ झाला आहे. मात्र, त्याचवेळी मुबईत आज दिवसभरात ५४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येतील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा ६ लाख ९१ हजार ६७० इतका आहे.https://platform.twitter.com/embed/Tweet.html?

मात्र, त्याचवेळी दुसरीकडे मुंबईत दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोजच्या मृत्यूंचा आकडा पुन्हा दोनअंकी होऊ लागल्याचं स्पष्ट झालं आहे. आजपर्यंत करोनामुळे मुंबईत १५ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचले का?  Ashok Chavan : ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही? ‘हे’ तीन नेते काय म्हणाले?