Maharashtra FYJC CET 2021 : परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया व परीक्षेचं स्वरुप

२१ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यभरात कोविड १९ च्या नियमांसह परीक्षा होणार आहे

राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी (FYJC CET 2021) कालपासून सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी नोंदणी करताना विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांक टाकल्यावर तेथे येणारी गुणपत्रिका आणि मूळ गुणपत्रिकेची जुळवाजुळव होत नसल्याने दिसत होते. मात्र काही वेळानंतर वेबसाईट व्यवस्थितपणे काम करु लागली आहे.

महाराष्ट्र अकरावी प्रवेशासाठी सीईटी फॉर्मसाठी ही cet-mh-ssc.ac.in लिंक  आहे. या परीक्षेसाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. २१ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यभरात कोविड १९ च्या नियमांसह परीक्षा होणार आहे. प्रवेश परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येईल.

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

FYJC CET 2021 साठी फॉर्म कसा भराल

अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पण ती केवळ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी अर्थात ऐच्छिक परीक्षा असणार आहे. सीईटी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पुढील पायऱ्यांचा वापर करा-

-महाराष्ट्र FYJC CET 2021 ची अधिकृत वेबसाइट cet-mh-ssc.ac.in वर जा.

-ड्रॉप डाउन मेनूमध्ये आपला बोर्ड निवडा

– नोंदणीसाठी नाव, संपर्क क्रमांक, जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचे माध्यम यासारख्या आवश्यक सर्व माहिती भरा..

– त्यानंतर जिल्हा व तालुका निवडून परीक्षा केंद्राचा तपशील निवडा.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

– फोटो, स्वाक्षरी, आयडी प्रूफ आणि काही दिव्यांग असल्यास त्याचे सर्टिफिकेट अपलोड करा.

– इतर सर्व औपचारिकता पूर्ण करा आणि सबमिट वर क्लिक करा.

– खात्रीसाठी महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी २०२१ च्या अर्जाची एक प्रिंट आउट घ्या.

कशी असणार परीक्षा

  • इयत्ता ११ वीची सामान्य प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावी अभ्यासक्रमावर आधारित असेल.
  • या परीक्षेसाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
  • या परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमातून उपलब्ध होतील.
  • ही परीक्षा ऑफलाइन स्वरुपाची असेल आणि प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न असतील.

सीईटी २०२१ च्या परीक्षेसाठीची अर्ज भरण्यासाठी सविस्तर सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. लिंकद्वारे महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी फॉर्म भरण्याची सुविधा २६ जुलै २०२१ पर्यंत आहे. सीईटी २०२१ फॉर्म लिंकवर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर तपासणी करत रहा.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार